---Advertisement---

भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र; तुषार दामगुडे- हनुमंत पवार वाद मारहाणीपर्यंत पोहोचला

By team
On: February 25, 2026 10:42 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

भाजपचे पदाधिकारी तुषार दामगुडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार  यांच्यात सोमवारी झालेल्या वादाचा पडसाद मंगळवारी राजकीय वर्तुळात जाणवला. सोमवारी दोघेही एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय चर्चासत्रात सहभागी झाले होते. परत येताना दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हनुमंत पवार यांना मारहाणी केली.

दामगुडेंनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आपल्याला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हनुमंत पवार यांनी पूर्वी धमकी दिली होती तसेच चर्चासत्रात जातिवाचक शिवीगाळही केली होती. त्यामुळे मी त्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर दिले, असे त्यांनी सांगितले.

दामगुडेंनी आणखी सांगितले की, हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात, त्यांना ठोस प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. चर्चासत्रात पवारांनी त्यांना उद्देशून “तू पेशव्यांची पैदास आहेस, तू नाना फडणीस यांची पैदास आहेस; मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे” अशा स्वरुपाचे विधान केले होते.

दामगुडेंनी नमूद केले की, मी नक्षलवादी भागात काम करतो; त्यामुळे माझ्याकडे कायदेशीर परवान्यासह बंदूक आहे, जी माझ्या सुरक्षेसाठी बाळगणे गरजेचे आहे. संबंधित पोलिसांकडे त्याचे शस्त्र सुपूर्द केले असून प्रकरणाचा योग्य तो तपास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, हनुमंत पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पवार म्हणाले, पोलिसांनी आरोपींना फक्त ताब्यात घेऊन नोटीस बजावली, परंतु गंभीर घटनांमध्ये संबंधितांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तसेच, तुषार दामगुडेंना स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल दिले गेले की इतरांना दमदाटी करण्यासाठी, याची चौकशीही होणे गरजेचे आहे. राजकीय वर्तुळात हा वाद जोर धरत असून, भाजप-काँग्रेसमध्ये सतत वाढणारा तणाव आता प्रशासन आणि पोलिसांच्या कारवाईकडेही लक्ष देण्यास भाग पाडत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!