---Advertisement---

स्कार्पिओ काच फोडल्याच्या वादातून खून; मोहोळ तालुक्यात नदीत आढळला मृतदेह !

By team
On: February 26, 2026 10:35 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक खुन उघडकीस आला आहे. बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील विजय भागवत जगझाप (वय ?) यांचा मृतदेह २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान वाळूज गावाजवळील नदीपात्रात आढळला. या घटनेमागील सुरुवात २१ फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दीपक कोळी व भुजंग कोळी यांच्या स्कार्पिओ गाडीची काच फोडल्याच्या वादातून झाली होती.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कोळी व भुजंग कोळी यांनी विजय याच्यावर काठीने मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यानंतर विजयाचा भाऊ योगेश जगझाप यांनी दोघांना तुमच्या गाडीचे नुकसान भरून देतो असे सांगून विजय याला एका खोलीत बसवले आणि बाहेरून कडी लावली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास योगेश जाग आल्यावर विजय त्याच्या खोलीत नव्हता.

विजयाच्या पत्नी पुण्याहून आल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरु झाली. या चौकशीत दीपक कोळी, भुजंग कोळी यांनी कोमल विजय जगझाप याला जातिवाचक शिवीगाळ करून धमकावले व “उद्याचा दिवस दिसू नये” अशी धमकी दिली. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी जगझाप कुटुंबीयांनी वैराग पोलीस ठाण्यात विजय हरवल्याची तक्रार नोंदवली.

२४ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता विजय यांचा मृतदेह मोहोळ तालुक्यातील वाळूज नदीत आढळल्यामुळे मोहोळ पोलीस ठाण्यात दीपक कोळी, भुजंग कोळी व निर्मला कोळी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर करीत आहेत. स्थानिक नागरिक आणि कुटुंबीय या घटनेमुळे हळहळ व्यक्त करत असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस सध्या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!