---Advertisement---

विद्यापीठ पातळीवर ‘सीमांतरंग’चा ठसा; दहा विद्यार्थ्यांना वैयक्तिक गौरव

By team
On: February 27, 2026 11:16 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४–२५ साठी आयोजित ‘सृजनरंग’ नियतकालिक स्पर्धेत सी.बी. खेडगी महाविद्यालयाच्या ‘सीमांतरंग’ या नियतकालिकास सर्वसाधारण तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. कुलगुरूंच्या हस्ते पारितोषिक वितरण
दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ सभागृहात आयोजित कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रकाश अण्णा महानवर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी लोककवी प्रशांत मोरे व प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सीमांतरंग’च्या वतीने डॉ. अशोक माळगे यांनी हा सन्मान स्वीकारला.

दहा विद्यार्थ्यांना वैयक्तिक गौरव या स्पर्धेत महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांना वैयक्तिक पारितोषिके मिळाली. त्यामध्ये – १) धनामा मडपती २) अनुष्का नागोरे ३) लक्ष्मी स्वामी  ४) रश्मी आकोबा ५) लक्ष्मी हिरेमठ  ६) स्वाती कोळी ७) मलकार मलकारी बिरादार ८) लक्ष्मी गायकवाड
९) पायल घोडके १०) पूजा डबरे  मान्यवरांकडून अभिनंदन या यशाबद्दल अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सेक्रेटरी सुभाष धरणे, प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले, ‘सीमांतरंग’चे समन्वयक डॉ. सी. डी. अणेकर, जी. एस. स्वामी तसेच सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!