ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधान भवनासह मुंबईतील चार ठिकाणी बॉम्बची धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ !

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची घटना घडली आहे. सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी ई-मेलद्वारे विधान भवनासह मुंबईतील चार ठिकाणी बॉम्ब धमकी देण्यात आली, ज्यात विधान भवन, मुंबई शेअर बाजार, मुंबई मेट्रो आणि मुंबई उच्च न्यायालय यांचा समावेश होता.

घटनेनंतर विधान भवनात तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, तसेच इमारतीत प्रवेश तात्पुरता बंद करण्यात आला. पोलिसांच्या वतीने विधान भवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून सर्व परिसर कसून तपासला जात आहे.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, धमकी मिळालेल्या ई-मेलमध्ये स्फोट होण्याची वेळ देखील नमूद करण्यात आली होती. मात्र, तपासात ही धमकी खोटी असल्याचे समोर आले असून कोणतीही खऱ्या धोके नाहीत.

गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले की, देश आणि राज्यातील शांतता भंग करणे हे काही विकृत व्यक्तींचे प्रयत्न आहेत, मात्र देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षित हातात आहे. त्यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने सर्व मंत्री आणि आमदार सुरक्षित आहेत, आणि सुरक्षा यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागले आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, ई-मेलचा तपशील आणि संबंधित व्यक्ती शोधण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!