---Advertisement---

आ.कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश; अक्कलकोटसाठी जवळपास १० कोटींचा निधी

By team
On: March 14, 2026 9:44 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी 

अक्कलकोट शहरातील नागरिकांना भेडसाविणाऱ्या दैनंदिन समस्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने नगरपरिषदेस 9 कोटी 95 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

अक्कलकोट नगरपरिषदेच्या पायाभूत सुविधात वाढ होऊन शहरवासीय व स्वामींभक्त यांच्या येणाऱ्या अडचणी यांचा विचार करून अक्कलकोट नगरपरिषद हद्दीतील स्वच्छता गृह आणि शौचालये यांच्या बांधकामे करण्यासाठी 2 कोटी रुपये,अक्कलकोट नगरपरिषद हद्दीतील ऍडव्हेंचर पार्कच्या दुसऱ्या टप्याच्या विकास कामासाठी 2 कोटी 35 लाख रुपये तसेच अक्कलकोट नगरपरिषद हद्दीतील रस्ते व गटारी यांच्या काँक्रेटीकारणासाठी 3 कोटी 80 लाख रुपये असे एकूण तीन कामासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान योजनेतून 8 कोटी 15 लाख रुपये असे असून त्याचप्रमाणे अक्कलकोट नगरपरिषद हद्दीतील दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी 1 कोटी 23 लाख रुपये तसेच नगरपरिषद हद्दीतील कालिका नगर येथील पिण्याच्या पाणी टाकीच्या बांधकामासाठी 55 लाख रुपये निधी मंजूर झालेले आहेत.

यातून अक्कलकोट शहराच्या सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणावरील विविध विकास कामांची भर पडून पायाभूत सुविधात मोठी वाढ होऊन नागरिकांची येणारी अडचण दूर होण्यासाठी मदत होणार आहे.या कामासाठी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचा सततचा पाठपुरावा आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब , आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे सहकार्य लाभल्याचे मिलन कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!