---Advertisement---

कोरबू मित्रपरिवारातर्फे रमजाननिमित्त ‘दावत-ए-इफ्तार’चे आयोजन

By team
On: March 15, 2026 11:09 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून भाजप अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबू यांच्या मित्रपरिवारातर्फे शनिवारी सायंकाळी ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, अक्कलकोट तालुका हा सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. येथे हिंदू-मुस्लिम समाजामधील एकता आजही टिकून असून रमजान, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली तसेच विविध गावांच्या जत्रा हे सण दोन्ही समाजातील नागरिक एकत्र येऊन साजरे करतात. ही परंपरा पुढेही कायम राहावी, असे सांगत त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ‘दावत-ए-इफ्तार’चे आयोजन केल्याबद्दल नन्नू कोरबू मित्रपरिवाराचे त्यांनी कौतुक केले.

याप्रसंगी अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक अविनाश मडीखांबे, पोलीस निरीक्षक दीपक भिताडे,मुस्तफा बळोरगी,शिवशरण जोजन, सागर हिप्परगी, ॲड. विजय हर्डीकर, डॉ. रवींद्र बनसोडे, नाविद डांगे, सुनील सिद्धे, प्रदीप पाटील, सुनील खवळे, शिवराज स्वामी, अजित सुतार, तम्मा शेळके, सद्दाम शेरीकर, कांतू धनशेट्टी, शुकुर शेख, सिद्धाराम टाके, अंकुश चौगुले,नागराज कुंभार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भैया नाईकवाडी, अल्ताफ कोरबू, हुसेन मुजावर, शकील नाईकवाडी, रशीद खिस्तके, अयाज चंदनवाले, सलीम शेख, अशपाक शेख, सैपन शेख, गौस पटेल आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर व बांधवांचे आभार हब्बू गवंडी यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!