---Advertisement---

“महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: विजेत्या कुस्तीपटूला किया कार, उपविजेत्याला बुलेट; सोलापूरतर्फे सन्मान आणि उत्सव!

By team
On: March 16, 2026 10:41 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

सोलापूर जिल्ह्यात निर्झरा केअर फाऊंडेशनतर्फे २८ व २९ मार्चला चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत विजेत्या कुस्तीपटूला ‘महाराष्ट्र केसरी’ किताब, मानाची गदा आणि किया सोनेट कार देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उपविजेत्या कुस्तीपटूला बुलेट दुचाकी प्रदान केली जाईल.

रविवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात वासा पूजन व माती पूजनाचा विधी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्याला दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचे अनावरण करण्यात आले. स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो व महाराष्ट्र केसरी गट (६५–७६ किलो) अशा वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिले तीन विजेते सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांनी सन्मानित केले जातील, तर सुवर्णपदक विजेत्याला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीसही दिले जाणार आहे.

निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी आपल्या वडिलांचा कुस्तीचा वारसा जपण्याच्या उद्देशाने सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महिलांना प्रोत्साहन देत म्हटले, “ही स्पर्धा यशस्वी करून संपूर्ण राज्यात सोलापूरने आदर्श कुस्ती स्पर्धा भरवली, हे दाखवूया. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे शिवधनुष्य सर्वांनी मिळून पेलूया.”

कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन सोमनाथ अळ्ळीमोरे, आतिश मोरे, समीर कोळेकर, महापौर विनायक कोंड्याल, पाटबंधारे खात्याचे माजी सचिव चन्नवीर बिराजदार, कुस्ती सम्राट अस्लम काझी, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, राजाभाऊ देशपांडे, केदार स्वामी आदी मान्यवरांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला कुस्तीला प्रोत्साहन दिले आणि स्पर्धेची महत्त्वपूर्णता अधोरेखित केली.

संचालिका स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी सांगितले, “वडील सिद्धाराम साखरे ज्येष्ठ कुस्तीपटू होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक मुलीला शिस्त, पारदर्शकता आणि सर्वोत्तम सुविधा दिल्या जातील.” या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक महिला खेळाडू भाग घेणार असून विजेत्या महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी यावेळी भाग्यश्री फंड चौथ्यांदा उतावळली आहे. यापूर्वी तिने तीन वेळा हा किताब जिंकला आहे.

स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे, परंतु सुविधा, आखाडे व स्पर्धांचे व्यासपीठ अभावामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर शक्य होत नाही. यासाठी त्यांनी निर्झरा फाऊंडेशनतर्फे नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला आहे, त्याचा एक भाग म्हणून ही महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!