---Advertisement---

जितेंद्र आव्हाडांनी सभागृहात अपमानास्पद वक्तव्य केले ; मंत्री देसाई !

By team
On: March 17, 2026 2:05 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, विधानसभेत काल धर्मस्वातंत्र्य बिलावर चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक संदर्भ देताना शिवरायांच्या राज्याभिषेकांसंदर्भात अपमानास्पद वक्तव्य केले. सभागृहात उपस्थित राहून ते म्हणाले की, आव्हाड यांना या वक्तव्याचे गांभीर्य नव्हते आणि त्यांनी माफी मागायला तयारही नव्हते, ज्यामुळे सभागृह तहकूबले.

शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले की, अध्यक्षांनी तीन वेळा आव्हाडांना शब्द मागे घेण्यास सांगितले आणि शेवटी अध्यक्षांच्या कडक सूचनेनंतरच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तरीही, त्यांच्या चेहऱ्यावरून हे वक्तव्य अनावधानाने गेले असल्याचे काहीच जाणवत नव्हते. मंत्री म्हणाले की, “त्यांना निलंबित करायला हवे होते, पण अध्यक्षांनी अखेर त्यांना अंतिम समज दिली.”

मंत्री देसाई यांनी याशिवाय स्पष्ट केले की, दिल्ली दौऱ्याबाबत आव्हाडांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे. “शिवसेना खासदारांची बैठक घेण्यासाठी आणि राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. जिल्हा परिषद निवडीसंदर्भात त्यांना दिल्लीला जाण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.

त्यांनी महायुतीच्या नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चा आणि समन्वय समितीबाबतही माहिती दिली. राज्यभर ज्या ठिकाणी महायुतीने निवडणूक लढवली नाही, त्या ठिकाणांचा अहवाल एकनाथ शिंदेंना दिला गेला आहे. यामध्ये उदय सामंत, शंभुराज देसाई, बावनकुळे, तटकरे, मुश्रीफ हे सदस्य आहेत आणि मित्रपक्षांबाबत समन्वय समितीत चर्चा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!