---Advertisement---

‘गणेश नाईकांनी फडणवीसांना भेटून शंका दूर कराव्यात’; उदय सामंतांचा पलटवार!

Follow Us:
---Advertisement---

पालघर, वृत्तसंस्था : पालघर जिल्ह्यातील भादवे-उसरणी येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पावरून वनमंत्री गणेश नाईक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जिल्ह्यात एखादा प्रकल्प येणार असेल, तर त्याची माहिती सर्वप्रथम पालकमंत्र्यांना मिळायला हवी, अशी भूमिका गणेश नाईक यांनी मांडत उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आता उदय सामंत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

गणेश नाईक यांच्याकडे वनविभागाची जबाबदारी आहे. वनविभागात काय सुरू आहे, याची माहिती आपण त्यांना देण्याची अपेक्षा करत नाही. त्याचप्रमाणे आपल्या विभागात काय निर्णय घ्यायचे, हे आपण मुख्यमंत्री आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांना उत्तरदायी राहून ठरवतो, असे सामंत यांनी स्पष्ट केले. प्रत्येक मंत्रालयातील निर्णयाची माहिती प्रत्येक मंत्र्याला देण्याची कोणतीही व्यवस्था नाही, असेही त्यांनी सुनावले.

गणेश नाईक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या काही शंका असतील, तर त्यांनी पत्रकार परिषद घेण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या दूर कराव्यात, असा सल्लाही सामंत यांनी दिला. या प्रकल्पाला काही ठिकाणी विरोध होत असल्याने त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आपल्या विभागात काय करायचे, हे संबंधित मंत्री आणि विभागाची प्रशासकीय यंत्रणा ठरवेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या पक्षात जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. पक्षाच्या धोरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांचाच आहे; उदय सामंत यांचा नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पक्षातील निर्णयप्रक्रियेवर भाष्य केले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!