---Advertisement---

तलावातील पाण्यामुळे ‘या’ गावच्या शेतकऱ्यांचा रस्ता गेला ‘पाण्यात’

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतकर्‍यांचा रस्ता ‘पाण्यात’ गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून त्याला पर्यायी रस्ता देण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

शिरवळ ते बादोला – बोरगाव रस्त्यावरील जवळपास चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांसाठी हा रस्ता आहे. परंतु तो पावसाळ्यात पाण्यात जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी मोठी अडचण निर्माण होत आहे. या रस्त्यावर सध्या आठ ते दहा फूट पाणी आहे. रस्ता पाण्यात गेल्यामुळे शेतात पिकलेले अन्नधान्य आता न्यायचे कुठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा आपण केलेला आहे पण उपयोग होत नाही अशी तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!