ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाहीय ; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : विकास दरापाठोपाठ जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही (डेमोक्रॅसी इंडेक्स) भारताची मोठी घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

काही दिवसांपूर्वीच जागतिक लोकशाही निर्देशांकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीतून भारताची दोन क्रमाकांनी घसरण झाली आहे. यावरुनच रोहित पवारांनी केंद्र सरकारनर निशाणा साधला आहे. तसं, ट्विटही त्यांनी केलं आहे.


‘EIU च्या लोकशाही निर्देशांकात आपल्या देशाची कामगिरी दरवर्षी खालावत असून २०१४ मध्ये असलेलं २७ वं स्थान २०२० मध्ये ५३ पर्यंत घसरलंय. हे नागरिकांसाठी घातक आहे. लोकशाही मूल्ये हा भारताचा आत्मा असून, लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाही याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवायला हवं, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!