ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राहुल गांधींचे मोठे विधानः म्हणाले, इंदिरा गांधींचा तो निर्णय चुकीचा !

नवी दिल्लीः कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे पक्षातील अनेक निर्णयावर जाहिर भाष्य करतात, त्यावर नाराजीही व्यक्त करतात. कॉग्रेस सरकारने लागू केलेल्या आणिबाणीवर विरोधकांकडून आताही टीका होते. आणिबाणीचा निर्णय काळा दिवस म्हणून मानला देखील जातो. दरम्यान राहुल गांधी यांनी देखील आणिबाणीवर भाष्य केले असून आणीबाणी लावणे चुकीचे होते असे मोठे विधान केले आहे. प्रसिद्द अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी संवाद साधतांना राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे. काँग्रेसकडून आणीबाणी लागू करणे एक चूक होती, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळे आहे, अशी टीका केंद्र सरकारवर केली.

देशात स्वतंत्रपणे कार्य करणार्या संस्थांमध्ये संस्थात्मक समतोल राखला जात असल्यानेच आधुनिक लोकशाही कार्य करतात. भारतात त्या स्वातंत्र्यावरच हल्ला केला जात आहे. आरएसएस नावाची एक मोठी संस्था इतर सर्व संस्थांमध्ये प्रवेश करत आहे. हल्ला होत नाही अशी एकही संस्था नाही आणि हे अत्यंत पद्दतशीरपणे सुरु आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!