---Advertisement---

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी

Follow Us:
---Advertisement---

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाल्याची माहीती आहे. या घटनेनंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. जखमींमध्ये दोघांची स्थिती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला करण्यात आला. जखमी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. आपण लग्नातून परतत असताना बॉम्बहल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. शोवन देबनाथ, विक्रम, अर्पण, स्वपन, महादेव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!