---Advertisement---

सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प ; अर्थसंकल्पावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रतिक्रिया

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि.८ : राज्याच्या अर्थसंकल्पात कुठल्याही घटकासाठी विशेष तरतूद नाही.जनतेची निव्वळ दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील जनतेच्या या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या परंतु सर्व अपेक्षांचा हिरमोड झाला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल अशी अपेक्षा होती. ती मावळली.

लॉकडाऊन काळामध्ये अनेक छोटे व्यावसायिक रस्त्यावर आले. त्यांच्यासाठी सरकार एखादे पॅकेज जाहीर करेल, असा अंदाज होता. गुजरातमध्ये तेलाचे दर दहा रुपये कमी आहेत. किमान या राज्याचे अनुकरण तरी सरकारने केले पाहिजे होते परंतु तसे केलेले दिसत नाही पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात काही उपाययोजना नाही.वीज बिल सवलतीचा विषय नाही. कुठलाही ठोस कार्यक्रम या अर्थसंकल्पात दिसून येत नाही.जनतेचा भ्रमनिरास करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!