---Advertisement---

मागच्या सरकारनं प्रकरण दाबलं – अन्वय नाईक कुटुंबीयांचा आरोप

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मागच्या सरकारने प्रकरण दाबलं असा आरोप अन्वय नाईक कुटुंबीयांनी आज घेतलेल्या पत्रकार केला. आम्ही मागील तीन वर्षांपासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. फक्त श्रीमंत व्यक्तींनाच न्याय मिळणार का? असा उद्विग्न सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

काल विधानसभेमध्ये विरोधी पक्षाने मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात आवाज उठवला होता. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना तत्काळ त्यांच्या पदावरून दूर करत आहे, अशी घोषणादेखील केली. त्याबरोबर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आम्ही एसआयटीची स्थापना करणार आहोत आणि एसआयटीद्वारे या प्रकरणाची चौकशी करणार आहोत, अशी माहितीदेखील या वेळेस गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती.

एसआयटीची स्थापना करायला सरकारला वेळ जरी लागला असला तरी, सरकारने घेतलेली ही भूमिका अत्यंत योग्य आहे. आमचा थेट आरोप आहे की, माझ्या बाबांच्या मृत्यूच्या वेळेस जे सरकार होते, ते युतीचे सरकार होते. तेच सरकार माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार आहे आणि अर्णब गोस्वामी हा आम्हाला सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या देत आहे. तसेच, आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आम्ही त्याच्या दबावाला बळी पडणार नाही आणि त्याला त्याच्या झालेल्या गुन्ह्याची आम्ही शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थदेखील बसणार नाही. याचा पाठपुरावा आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना दोघांना सातत्याने करणार आहोत. वेळ आली तर आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांची भेटदेखील घेऊ, अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!