---Advertisement---

माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक

Follow Us:
---Advertisement---

सातारा : माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे वयाच्या ९२व्या वर्षी बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना एकूण तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. माण तालुक्यातील पळसावडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली. महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या बंगल्याच्या शेजारी निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशीच सर्वांनी भावना त्यावेळी व्यक्त झाली होती.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!