---Advertisement---

….तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला बसू शकतो फटका … !

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूक जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाकडून समाधान अवताडे हे उमेदवार असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असून भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी आपले मित्रपक्ष असलेल्या रासपला प्रचार शुभारंभाला तसेत कोणत्याही निवडणुकीसंदर्भात बैठकीत बोलवण्याचे औदार्य दाखविले नाही.

रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार माजी मंत्री महादेवजी जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांच्या निधनाने रासप परीवार दुःखामध्ये आहे.एकीकडे महाविकास आघाडी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून भाजपाने मात्र आपल्या मिञपक्षाला प्रचारात सहभागी करुन न घेता व महादेव जानकर यांचे प्रचारपञिकेवर फोटो न छापल्याने रासपचे अनेक सैनिक नाराजी व्यक्त केली आहे.

याचा फटका भाजपला बसल्यास त्यांनी रासपला दोष देऊ नये असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी केले आहे. रासपची या विधानसभा मतदारसंघात भाजपपेक्षा मोठी ताकद आहे. रासप हा सर्व सामान्य जनतेला घेऊन चालणारा पक्ष आहे. या विधानसभा मतदारसंघात बहुजन समाजातील विविध जातींना न्याय मिळवून देण्यासाठी रासपने अनेक आंदोलने व मोर्चा काढण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाने हवेत राहू नये. यापूर्वी दोन वेळा या मतदारसंघात पराभूत होऊन देखील जर जागे होत नसाल तर दूर्दैव आहे.

जर येत्या एक दोन दिवसात जर रासपला योग्य मान सन्मान देऊन प्रचारात सहभागी करुन घेतले तर ठीक आहे नाहीतर आमचा मार्ग मोकळा आहे असे बंडगर यांनी सांगितले आहे. शेवटी अंतिम निर्णय आमचे नेते महादेव जानकर जे सांगतील त्यांचे आदेशाची वाट पाहत आहोत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!