---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Follow Us:
---Advertisement---

मुंबई,दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. दि. १ मार्च रोजी साहेबांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. योगायोग म्हणजे आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रत्येकाने आपापले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जे.जे. रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा मोरे यांनी लस दिल्याबद्दल साहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व वैद्यकीय पथक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!