---Advertisement---

आरपीआयच्यावतीने अक्कलकोटमध्ये डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात,कोरोनामुळे साधेपणाने साजरी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.१४: रिपब्लिकन पार्टी
ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात उत्सव न करता शासनाचे नियम पाळुन जयंती साजरी करण्यात आली.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले व रिपाइं महाराष्ट्र राज्यचे सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी स्वघरी दक्षिण पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व गोड लाडू वाटप करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट,बस स्थानक अक्कलकोट,येथे प्रतिमा पुजन करण्यात आले.

यावेळी बोलताना रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी अक्कलकोट तालुक्यातील जनतेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व कोरोनासारखी महाभयंकर महामारी संपूर्ण जगात थैमान घालत असुन सर्वानी त्रिसूत्री कार्यक्रम (मास्क,सुरक्षित अंतर,सॅनिटीझर) अंगीकारून स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी व जयंती मोठ्या प्रमाणात साजरी न करता आपल्या परिसरातील गरीब गरजु लोकांना मदत करावी,असे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक नागराज कुंभार,रिपाइंचे शहर अध्यक्ष प्रसाद माने,उदय सोनकांबळे सूरज सोनके,विलास गायकवाड आकाश गायकवाड चंदू गायकवाड,शुभम मडीखांबे,आकाश मडीखांबे,विकास इंगळे जयभीम गायकवाड,प्रशांत सोनके,बंटी मडिखांबे,भीम मडिखांबे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!