---Advertisement---

काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह भाजपच्या निशाण्यावर

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : नेहमी वादग्रस्त वक्तव्व्यांमुळे चर्चेत असणारे काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

क्लब हौसमधील एका भाषणामुळे दिग्विजयसिंह भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. दिग्विजयसिंह यांनी क्लब हौसमधील संभाषण दरम्यान काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू, असे म्हंटल्याचा दावा भाजपचे नेते अमित मालविया यांनी केला आहे.

भाजप नेते दिग्विजयसिंह यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. क्लब हौस मधील संभाषणाचा काही भाग अमित मालविया यांनी ट्विटरवर शेयर केली आहे. क्लब हौसमधील या संभाषणाला पाकिस्तानमधील एक पत्रकारही उपस्थित होता असं अमित मालविया यांनी म्हंटले आहेत. अमित मालविया यांचं ट्विट भाजपचे नेते गिरीराजसिंह यांनी रिट्विट करत काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!