मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून ओबीसींचा इंपिरियल डेटा आढावा केंद्रसरकारने ओवेसींचा इम्पेरियल डेटा सुप्रीम कोर्टात न दिल्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात ओबीसींचा राजकीय आरक्षण रद्द झाला आहे अशी खोचक टीका शिवसेनाप्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका ही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आरक्षणाचा याच मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाली अशी, टीका शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केंद्र सरकारकडून इम्पीरियल डेटा आणावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.






