---Advertisement---

सोलापुरात एमआयएमला मोठा हादरा; प्रदेश कार्याध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

By team
On: December 28, 2025 7:12 PM
Follow Us:
A big shock for MIM in Solapur; State working president resigns abruptly
---Advertisement---

सोलापूर प्रतिनिधी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एमआयएमला राज्यात मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच सोलापूर शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एमआयएमचे खासदार एम्तियाज जलील यांच्यानंतर राज्यातील फारूक शाब्दि हे दुसरे मोठे नेते मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.

फारूक शाब्दि यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पक्षात त्यांची मजबूत पकड मानली जात होती. सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. मात्र पक्षातील अंतर्गत राजकारण आणि मतभेदांमुळे आपण राजीनामा देत असल्याची माहिती समोर येत आहे.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा राजीनामा एमआयएमसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरसारख्या महत्त्वाच्या शहरात शाब्दि यांच्या नेतृत्वामुळे पक्षाला बळ मिळत होते. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे एमआयएमची संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे एमआयएमने सोलापुरात काँग्रेसला देखील मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी थेट एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दि यांच्या उपस्थितीत झाला होता आणि त्यानंतर काही वेळातच शाब्दि यांनी राजीनामा दिला.

या घडामोडींमुळे सोलापूर महापालिका निवडणुकीतील राजकीय गणित बदलण्याची शक्यता असून, एमआयएमसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!