ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला ; मुख्यमंत्री शिंदेची ठाकरेंवर टीका

सोलापूर : वृत्तसंस्था

इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. याच कार्यक्रमातील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.

राज्यातले उद्योग पळवले अशी ओरड काहीजण करत आहेत. परंतु तुम्ही जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तर उद्योगपती पळतील नाहीतर काय करतील, असा थेट आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,पूर्वी लाभ घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. हे शासन गोरगरीब, शेतकरी, कामगार, वारकरी यांचे आहे. या योजना सामान्यांना मिळत नसतील तर शासनाचा उपयोग काय? म्हणून आम्ही हा शासन आपल्या दारी हा उपक्रम आणला. लोकाभिमुख सरकारला आशीर्वाद देण्यासाठी आपण आलात. जिल्ह्यातील 35 लाख 65 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. साडेचार कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आरोपातून उत्तर देत बसणार नाही तर विरोधकांना कामातूनच उत्तर देऊन त्यांना त्याची जागा दाखवून देईल. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं काही आहे का? शेतकऱ्याच्या मुलांनी मुख्यमंत्री होऊ नये का? असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!