सोलापूर : प्रतिनिधी
लातूर-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी बसलेल्या लोकांना एका कारने चिरडले आहे. वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील तिघे गंभीर व्यक्तींची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चित्तथरारक घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी, सकाळच्या वेळी औसा जवळील सीएनजी पंपावरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. लातूर कडे येणारी कार भरधाव वेगाने हॉटेलमध्ये शिरली. अचानक झालेल्या या अपघातामुळे हॉटेलमधील नाश्त्यासाठी आलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. हा अपघात अतिशय भयंकर अशाप्रकारचा होता. या अपघातात कार मधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. औसा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
औसा इथून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. तर या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. तीनही व्यक्तींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.