---Advertisement---

मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणजे काटेरी ; मुख्यमंत्री शिंदे

By team
On: March 10, 2024 10:31 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागल्यानंतर राज्यातील सत्ताधारी देखील आतापासून तयारीला लागले आहे तर मुख्यमंत्री शिंदे देखील राज्यातील अनेक भागात दौरे सुरु केले आहे. शिवसेना महिला सेनेचे ‘शिवदुर्गा महिला संमेलन’ मुंबईतील सायनमध्ये पार पडले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्रीपद हे मोठे असले तरी या पदाची खुर्ची ही काटेरी आहे. गेल्या दोन दिवसांत मी एक मिनिटही झोपलो नाही असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे झालो असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ”सर्वांना मुख्यमंत्रीपद हे खूप मोठे त्याचे अधिकार मोठे असे वाटत असते. मात्र असे असले तरी या पदाची खुर्ची ही काटेरी आहे. कारण गेल्या दोन दिवसांत मी एक मिनिटही झोपलो नाही. काल हातकणंगले होतो. त्यानंतर रात्री दिल्लीला गेलो. पहाटे पाटण सात वाजता कार्यक्रमात हजर होतो. त्यानंतर तेथून कोकणात गेलो”, असे शिंदेंनी सांगितले.

याशिवाय ”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा नेहमी म्हणायचे शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे रणरागिणी आहे. अन्यायाला वाचा फोडून देण्याचे काम महिला आघडी करते. त्यांचे हेच विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. आज बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादामुळेच मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री झालो. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. यामध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागला”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

तसेच एकनाथ शिंदे म्हणाले, आत्ताच महाशिवरात्री आणि जागतिक महिलादिन झाला. त्या कार्यक्रमाला 80 ते 85 हजार महिला उपस्थित होत्या. आज देखील मोठी गर्दी आहे. समाजाला आकार देण्याचं काम महिला करतात. समाजात क्रांती देखील महिला घडवून आणू शकतात. एकावेळी अनेक भूमिका पार पाडत असतात. शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे रणरागिणी आहे”.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!