अक्कलकोट: प्रतिनिधी
अक्कलकोट तालुका येथील बोरगांव (दे) येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव भोसले यांच्या शेळीने ४ पिल्लाना जन्म दिले असून, शेती बरोबरच पशु पालनाचा जोड व्यवसाय समृद्ध ठरत असून, शेतकऱ्याने शेतीबरोबरच जोड व्यवसायाला महत्व देऊन कार्यरत राहणे ही काळाची गरज आहे, यावरून स्पष्ट होत आहे.
प्रगतशील शेतकरी आनंदराव भोसले यांनी शिवारातच कमी शेतजमीन, पाण्यामध्ये विविध हंगामातील पिकात अंतर पिके देखील घेतात. शेतीवरच अवलंबून न राहता जोड व्यवसायाकडे त्यांचा कल नेहमीचाच आहे. या मध्ये शेळी पालन देखील करत आहेत. त्यांच्या शेळीने ४ पिल्लाना जन्म दिले आहे. आनंदराव भोसले यांच्या कडे सध्या ३० शेळी ७ बोकड यांचे पालन करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसाय आनंदराव भोसले हे करत आहेत. अन्य शेतकऱ्याने देखील केवळ शेतीवरच अवलंबून न राहाता शेती पूरक जोड व्यवसाय करावा असा संदेश या माध्यमातून भोसले यांच्याकडून दिला जात आहे. शेळीच्या ४ पिल्लाना पाहण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भोसले यांच्या फार्महाऊसला गर्दी केलेली होती. आनंदराव भोसले त्यांचे पुत्र शरद भोसले शेतीसह जोड व्यवसायाला मोलाची साथ देत आहेत.
शेतकऱ्यांनी जोड व्यवसायाला महत्व द्यावे – अलीकडच्या काळातील पर्जन्यमान, हवामान पाहता शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा हाताला आलेले पिक वाया जाणे, धान्याला भाव न मिळणे आशा कठीण प्रसंगाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. आशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी जोड व्यवसायाला महत्व देवून शेती करावी.– आनंदराव भोसलेप्रगतशील शेतकरी, बोरगांव (दे)