---Advertisement---

रोटरीने केली कल्लप्पावाडीत १२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

By team
On: May 12, 2025 5:19 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

रोटरी क्लब अक्कलकोट तर्फे कल्लप्पावाडी येथे १२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हा उपक्रम रोटरीने राबविला.यामध्ये दंत तपासणी ,बीपी व शुगरची तपासणी मोफत करण्यात आली. यासाठी कल्लप्पावाडी येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये २५ नवीन रुग्णांची शुगर डिटेक्ट झाली व १५ लोकांची नवीन बीपी डिटेक्ट झाली.

ह्या सर्वांना पुढील उपचारासाठी रोटरी क्लब ऑफ अक्कलकोट तर्फे ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहेत तसेच दंत रुग्णांनाही सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.विपुल शहा यांनी दिली.या शिबिरास सेक्रेटरी डॉ. प्रशांत वाली, खजिनदार डॉ.प्रमोद सुतार,गुरुशांत पाटील आदींची
प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी सभापती महेश जानकर,पोलीस पाटील मुकेश जानकर,नानाराव बंडगर,सरपंच जयकुमार जानकर,उपसरपंच शिवानंद बंडगर तसेच
सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!