अक्कलकोट : प्रतिनिधी
मागील सर्व अर्थसंकल्पमधील मध्यम वर्गीयांसाठी ची झालेली हिरमोड ह्या अर्थसंकल्पामध्ये भरून काढायचा प्रयत्न मा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले दिसते. २०२५ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षीच्या बजेटमध्ये विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांना एक मोठी भेट दिली. नवीन कर प्रणाली नुसार, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स (आयकर) लागणार नाही तर, नवीन कर स्लॅबमध्ये १२ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनाही फायदा होईल. परिणामी वाचलेली कराची रक्कम खर्चासाठी पुन्हा बाजारात येऊन एकंदरीत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि विकसित भारत बनण्यास नक्कीच बळ मिळेल.
सीए ओंकारेश्वर अशोक उटगे
अक्कलकोट
मो नं ९४०३३९७०११