सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर-पुणे महामार्गावर तेलंगवाडी (ता. मोहोळ) गावाजवळ रविवार, दि.१२ मे रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस (क्र.एमपी ०९ डीएल ८०९१) ने पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका ट्रक (क्र. एमएच १२ एसई ५२७२) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ५ प्रवासी गंभीर जखमी झाले तर अन्य ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासगी ट्रॅव्हल्स बस ही मुंबईहून हैदराबादकडे निघाली होती. रविवारी रात्री अडीचच्या सुमारास सदर बस ही तेलंगवाडी परिसरात आली असता बसच्या चालकाला झोप लागल्यामुळे त्याचा olphin बसवरील ताबा सुटून बस समोर असलेल्या ट्रकवर जावून आदळली. या भीषण अपघातात बसमधील ५ प्रवासी गंभीर तर इतर ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका, शेटफळ, मोहोळ येथील शासकीय आणि खासगी रुग्णवाहिकेतून सोलापूर आणि मोहोळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गस्ती पथकाचे उमेश भोसले, वाहन चालक नागनाथ भालेराव, सहाय्यक नवनाथ मोरे, रुग्णवाहिका पथकातील डॉ. गोरख लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे, क्रेन चालक अंकुश कुमार, मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भारत रोकडे आणि त्यांचे कर्मचारी, हंचे, रूपणवर, पवार, माळी आणि मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी पवार आणि सर्जेराव तसेच मोहोळ पोलीस स्टेशन येथील गस्ती पथक आणि त्यांचे कर्मचारी स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. सदर अपघाताचा पुढील तपास मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी पवार (ढरक) आणि सर्जेराव हे करत असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्थी पथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली