अक्कलकोटमध्ये भाविकांची अभूतपूर्व गर्दी : १२ लाखांहून अधिक भक्तांनी घेतला स्वामींच्या महाप्रसादाचा लाभ !
अक्कलकोट : प्रतिनिधी
दीपावलीच्या सुटीमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थाच्या दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दीपावलीच्या सुट्टीच्या काळात गेल्या १५ दिवसात १२ लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
सलग सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविक आलेले होते. त्या प्रसंगी सर्व प्राप्त परिस्थितीचा विचार करून न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून येणाऱ्या भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी येथील कर्मचारींनी भाविकांचे हित जपले.भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी येथील कर्मचारी व सेवेकरी रात्रंदिवस धडपडत आहेत. न्यासाकडून अन्नदानाची वेळ वाढविली होती.
यंदाच्या वर्षी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला
अक्कलकोटला जोडणारी रस्ते हे चांगल्या प्रतीचे झाल्यामुळे हे सकारात्मक चित्र आहे. दीपावलीनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. असे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी सांगितले.