---Advertisement---

ठाकरे गटाला धक्का : ५०० कार्यकर्ते मनसेत होणार दाखल

By team
On: February 4, 2024 10:31 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता, पण आता आगामी निवडणूक लक्षात घेता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरुन पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. नाशिक, सोलापूर दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मात्र, या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठा खिंडार पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सिल्वासा येथील ठाकरे गटाचे तब्बल ५०० कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. रविवारी सकाळी १० वाजता मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!