ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.सुरेश धस यांची ‘खोक्या’बाबत धक्कादायक खुलासा !

मुंबई : वृत्तसंस्था

बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर दूर जावे लागले होते तर आता बीडमधील शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. तेव्हापासून या सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ची चर्चा सुरू आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे खुद्द सुरेश धस यांनी हे मान्य केले होते. सतीश भोसलेचे सुरेश धसांसोबतचे फोटो, त्याच्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा, तसेच तो दाखवत असलेले पैसे या सर्वांवर सुरेश धस यांनी ‘एका मराठी वृत्तवाहिनी’ने घेतलेल्या मुलाखतीत बोलताना खुलासा केला आहे.

सुरेश धस म्हणाले, हा जो महाशय आहे तो पारधी समाजाचा मुलगा आहे. त्याच्यावर दोन गुन्हे तर मीच दाखल करायला लावले आहेत. आता भोसले आडनाव म्हणून काल-परवा पासून फिरवले जातंय. काही जणांकडून असे सांगितले जातंय की, तो मराठा समाजाचा आहे. पण तो मराठा समाजाचा नाही. पारधी समाजाचा आहे. त्याची काय टोळी वगैरे नाही. तो मुकादमांना लेबर पुरवणाऱ्यांपैकी एक कार्यकर्ता आहे. त्याची जी चूक झाली असेल, त्या चुकांबाबत आम्ही त्याच्या कधी पाठीशी उभे राहत नाहीत, असे सुरेश धस म्हणाले.

फेसबुकवर कोण कुणाला बॉस करेल, कोण कुणाला त्याचे सरकार करेल, त्याचे आपण काय करु शकतो? बॉस म्हणून लिहिले, सरकार म्हणून लिहिले, असे अनेक लोकं लिहितात ना, तो काय माझा कारभार वगैरे थोडी चालवतो?, असा सवाल सुरेश धस यांनी केला. धनंजय मुंडे यांचा पूर्ण कारभार वाल्मीक कराड पाहायचा. तसाच सतीश भोसले हा माझ्याशी इतका संबंधित किंवा जवळचा नाही. तो भोसले मुकादमांना लेबल पुरवण्याची काम करतो. एवढी मला त्याची माहिती असल्याचे सुरेश धस म्हणाले.

माझ्याकडे आल्यानंतर कुणाला फोटोसाठी नाही म्हणता येत? फोटो काढायचा आहे तर काढा. तो मागे काही दिवस माझ्या विरोधातही गेला होता. तो पंकजा ताईंच्या गटात गेला होता. आमचा गट सोडून गेला खोक्या, असा खुलासा सुरेश धस यांनी केला. शुभेच्छा द्याव्याच लागतात ना? सर्व दुनियेला शुभेच्छा द्याव्या लागतात. आदल्या दिवशी मी विसरलो असेल, मग कुणीतरी सांगितले की, याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या आहेत. त्यामुळे बीलेटेड वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही तुमचाही जन्म दिवस द्या. तुम्हालाही बीलेटेड का असेना, तुम्हालाही शुभेच्छा देऊन टाकेन, असाही खुलासा सुरेश धस यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!