ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा” ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला

मुंबई, वृत्तसंस्था 

उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्यातच भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलेलं असताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीसांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर तीन नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपचं हिंदुत्व हे निवडणुकांपर्यंत मर्यादित आहे. आता त्यांचं हिंदुत्व उघडं पडलं आहे. यांचं सरकार आल्यावर हिंदू मंदिरं धोक्यात येतात. महायुतीचं सरकार असताना आम्ही सातत्याने रस्त्याचा घोटाळा उघड केला आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.आत्ता भाजपचे नेते म्हणत आहेत रस्त्यांवर SIT लावा, EOW ची चौकशीची मागणी आहे. ७०० किलोमीटरच्या रस्त्यांचा घोटाळा झालेला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते घोटाळ्याचं भूमिपूजन झालं असून २०२२-२४ पर्यंत रस्ते झालेले नाहीत. जेव्हा आम्ही बोलत होतो, पुरावे देतो तेव्हा भाजप का गप्प होतं.?

देवेंद्र फडणवीस यांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. याशिवाय मुंबईतल्या कचऱ्याच्या बाबतीतही आदित्य ठाकरेंनी महायुतीवर ताशेरे ओढले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!