---Advertisement---

अभिजित पाटील मित्र परिवारातर्फे रविवारी चपळगाव येथे बैलगाडा शर्यत

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१६ : भाजयुमोचे
माजी तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील मित्र परिवारातर्फे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.१९ मे रोजी सकाळी ९ वाजता या शर्यतीला प्रारंभ होईल,अशी माहिती युवा नेते अभिजीत पाटील यांनी दिली.या स्पर्धेचे उद्घाटन हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चपळगावचे माजी सरपंच उमेश पाटील हे राहणार आहेत.कार्यक्रमास नीराणी एमआरएन इंडस्ट्रीचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील,ओंकार पाटील,पंडित पाटील,सुरेश सुरवसे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ५१ हजार रुपये सागर कल्याणशेट्टी यांच्याकडून आहे.द्वितीय पारितोषिक २५ हजार रुपये रविकांत पाटील यांच्याकडून,तृतीय बक्षीस ११ हजार रुपये पंडित पाटील यांच्याकडून तर उत्तेजनार्थ बक्षीस ७ हजार ७११ रुपये
सुरेश सुरवसे यांच्याकडून देण्यात येणार आहे.चपळगावमध्ये प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत असून प्रवेश फी आणि स्पर्धेचे नियोजन चेतन भोसले,संतोष बटगेरी व अभिजीत पाटील मित्र परिवाराकडे असून या शर्यतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील यांनी
केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!