---Advertisement---

लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार

By team
On: February 8, 2024 9:54 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

महाविद्यालयात झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन कालांतराने हे दोघेही वेगळ्या ठिकाणी कामासाठी फिरत राहिले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पुन्हा संपर्क वाढवून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाची विचारणा केली असता सेटल झाल्यानंतर लग्न करू, असे बोलत खोटेनाटे बोलत तो फसवत राहिला. आरोपीचे यापूर्वीच लग्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. हि घटना सोलापूर शहरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका उच्चभ्रू समाजात राहणाऱ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल ईश्वर दत्तात्रेय पिंगळे (रा. दमाणी नगर) याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता ही मूळची सोलापूरची असून, पुण्यात एका बँकेत मोठ्या पदावर आहे. दर शनिवारी रविवारी आरोपी पुण्यात जाऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवत असे. लग्नाची विचारणा केली असता १३ फेब्रुवारीला लग्न करू असे सांगून तो सोलापुरात परतला.

दरम्यान, त्याच्या इन्स्टाग्रामवर एका महिलेचा फोटो दिसून आला. अधिक चौकशी केली असता त्याच्याबरोबर तिचे लग्न झाल्याचे दिसून आल्याने पीडिता हादरून गेली. व तिने तडक पुण्यातून सोलापुरात येऊन त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलास जाब विचारला. त्यावेळी त्याने तिला चापट मारून तिच्या हातातून मोबाईल काढून फोडून फेकून टाकला. पिंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास देशमुख हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!