---Advertisement---

सकारात्मक दृष्टिकोनातूनच यश प्राप्ती : बावडे ; आहेरवाडीत दहावी – बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

Follow Us:
---Advertisement---

दक्षिण सोलापूर, दि.१३ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील श्री मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गुरूपादप्पा तुप्पद हे होते. या समारंभात संचारचे पत्रकार मारुती बावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात कठोर परिश्रम घ्यावे. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आई-वडील शिक्षकांचा आदर करण्याबरोबरच समाजातील मान्यवर व्यक्तींशी विनम्र रहावे. कठोर मेहनती शिवाय या जगात काहीच नाही. कुठल्याही कामात सातत्य असल्याशिवाय यशोप्राप्ती नाही असे सांगून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना प्राचार्य तुप्पद यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व तयारीबद्दल मार्गदर्शन केले. या पुढच्या काळात आव्हाने खूप येत राहतील. त्या आव्हानांचा सामना करून जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र त्यांनी यावेळी दिला. यावेळी नवनाथ क्षीरसागर, रामचंद्र चिंचोळी, रेवणसिद्ध उमाटे, गुरुनाथ बिराजदार, नागनाथ बम्मणगे, निंगप्पा मोकाशी यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!