---Advertisement---

२६/११ च्या हल्ल्यानंतर काँग्रेसकडून वेगाने कारवाई होणे अपेक्षित होते, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांचा कॉंग्रेसला घरचा आहेर

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाचा वाद सुरू असताना आता काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकात मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यावरुन उपस्थीत केलेल्या प्रश्नावरुन खलबळ उडाली आहे. मनीष तिवारी यांच्या पुस्तकाचे नाव 10 FLASHPOINTS; 20 YEARS असे आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आपल्या नवीन पुस्तकात २००८ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना तत्कालीन यूपीए सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात १६० पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. तसेच ३०० पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. २६ सप्टेंबर २००८ रोजी मुंबईवर पाकिस्तानने हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई न करणे हा तत्कालीन केंद्र सरकारचा कमकुंवतपणा होता असे तिवारींनी लिहिले आहे.

यावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या पुस्तकात दिलेल्या तथ्यानंतर हे स्पष्ट झाले आहे, की, काँग्रेसचे सरकार काहीच कामाचे नव्हते. ते म्हणाले, ‘या पुस्तकाचा सारांश हा आहे की, २६/११च्या वेळी संयम ही ताकद नव्हे तर कमकुवत पणाचे लक्षण आहे. भारताला त्यावेळी कडक कारवाई करायला हवी होती. आज काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी स्वीकारले आहे की, त्यांच्या काँग्रेस सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पणाला लावला होता. भारताच्या वीर सेनेला केंद्र सरकारने त्यावेळी खुले अधिकार का दिले नाही, असा प्रश्नही त्यांनी सोनिया गांधी यांना केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!