---Advertisement---

अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर

By team
On: October 19, 2024 7:42 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई वृत्तसंस्था

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजप 155 जागा, शिवसेना शिंदे गट 78 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 55 जागा लढवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे, ज्यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं समाविष्ट आहेत.

अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

बारामती – अजित पवार

येवला – छगन भुजबळ

कागल – हसन मुश्रीफ

परळी – धनंजय मुंडे

दिंडोरी – नरहरी झिरवळ

अमळनेर – अनिल पाटील

तुमसर – राजू कारेमोरे

अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे

अहेरी – धर्मारावबाबा आत्राम

पुसद – इंद्रनील नाईक

वसमत – चंद्रकांत नवघरे

कळवण – नितीन पवार

सिन्नर – माणिकराव कोकाटे

निफाड – दिलीप बनकर

देवळाली – सरोज अहिरे

शहापूर – दौलत दरोडा

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर – संजय बनसोडे

जुन्नर – अतुल बेनके

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील

खेड, आळंदी – दिलीप मोहिते

इंदापूर – दत्तात्रय भरणे

मोहोळ – यशवंत माने

मावळ – सुनील शेळके

वाई – मकरंद पाटील

चिपळूण – शेखर निकम

पिंपरी – अण्णा बनसोडे

वडगाव शेरी – सुनील टिंगरे

चंदगड – राजेश पाटील

हडपसर – चेतन तुपे

अकोले – किरण लहामटे

करमाळा – संजय शिंदे

मोर्शी – देवेंद्र भुयार

कोपरगाव – आशुतोष काळे

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

माजलगाव – जयसिंह सोळंके

अहमदपूर – बाबासाहेब पाटील

अणुशक्तीनगर – सना मलिक

शिवाजीनगर मानखुर्द – नवाब मलिक

अमरावती शहर – सुलभा खोडके

इगतपुरी – हिरामण खोसकर

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!