अक्कलकोट वृत्तसंस्था
अक्कलकोट तालुक्यातील १३५ गावे, वाड्या वस्तीमध्ये घरोघरी जाऊन देशहितासाठी शंभर टक्के मतदान करा. जात, नेता, भाषा, क्षणिक स्वार्थाचा विचार न करता राज्याची सुरक्षा, शाश्वत विकास,आरोग्य योजना, शैक्षणिक सुविधा या मुद्द्याचा विचार करून शंभर टक्के मतदान करा,असे आवाहन करत अक्कलकोटच्या प्रबोधन विकास मंचने मतदार जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबविला आहे.
याबाबत पत्रक वितरणाचे काम प्रत्येक गावात, परिवारात व विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे, मतदार जागृतीचे कार्य जोमाने चालू आहे. लोकसभेला मतदानाची टक्केवारी कमी झाली तसे विधानसभेला होऊ नये म्हणून अक्कलकोट तालुक्यात प्रबोधन मंच्याच्या माध्यमातून गावागावात कॉर्नर बैठका, मतदार जागृती पर व्याख्यान, घरोघरी पत्रक वितरण, वैयक्तिक संपर्क, प्रत्यक्ष मतदान दिवशी प्रत्येक मतदाराकडून मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध पद्धतीने कार्यकर्ते काम करत असल्याने यंदा मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, अशी आशा आहे असे मत प्रबोधन मंचाचे संयोजक तम्मा शेळके यांनी व्यक्त केली आहे.