अक्कलकोट, वृत्तसंस्था
येथील फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांची मराठा मंदिर मुंबई संचलित येथील निर्मलाराजे कन्या प्रशाला या माध्यमिक प्रशालेच्या शालेय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसंगी बोलताना अध्यक्ष इंगळे म्हणाले, राजीव माने हे तालुक्यातील शिक्षण प्रणालीवर विशेष लक्ष ठेवून धोरणात्मक काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. याची दखल घेऊनच मराठा मंदिरच्यावतीने मराठा मंदिर संचलित येथील निर्मलाराजे कन्या प्रशालेवर त्यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे मनोगत व्यक्त करून राजीव माने यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, संतोष जाधव-फुटाणे, विश्वस्त मोहन चव्हाण, पत्रकार मारूती बावडे, बाळासाहेब एकबोटे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, दर्शन घाटगे, तुषार मोरे, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.