---Advertisement---

न्यासातर्फे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा

By team
On: November 5, 2024 5:48 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला.

दरम्यान ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी नूतन आमदार चित्राताई वाघ, भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा होळीकट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, आरपीआय (आठवले गट) तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, सो.म.पा.माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, दुधनी कृषी उत्पन्न बजार समितीचे उप सभापती सिद्धराम बाके, नागराज कुंभार, प्रदीप हिंडोळे हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मंडळाचे विश्वस्त संतोष भोसले, मनोज  निकम, प्रविण देशमुख, न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, अमित थोरात, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रविण घाडगे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, गणेश भोसले, संतोष माने, गोरख माळी, बाबुशा महिंद्रकर, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, चंद्रकांत हिबारे, दत्ता माने, मल्लिनाथ कोगनुरे, स्वामिनाथ गुरव, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी,  राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!