---Advertisement---

सुनीता दुपारगुडे यांची सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी निवड

By team
On: November 6, 2024 10:17 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील ग्रामपंचायतच्या माजी सदस्य सुनीता तुकाराम दुपारगुडे यांची सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते सुनीता दुपारगुडे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी ,  शिवसेना ठाकरे गटाचे  तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे अरुण गायकवाड, इंद्रजीत वाघमारे , विनोद थोरे , अनिल कांबळे, विजय दुपारगुडे संविधान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम दुपारगुडे , संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर थोरे आदींची  प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सुनीता दुपारगुडे यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा गावोगावी वाड्या वस्त्यांवर पोहचविणार असून काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे . माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करू, असे यावेळी सांगितले.

सुनीता दुपारगुडे या मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना राज्य शासनाच्या ग्रामविकास जलसंधारण मंत्रालयाचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार तसेच राज्यस्तरीय राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. सुनिता दुपारगुडे यांच्या  निवडीबद्दल खासदार प्रणिती शिंदे , माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष शाहीन शेख आदींसह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!