---Advertisement---

अक्कलकोट : ट्रॅक्टर पलटी होऊन एक जण ठार

By team
On: May 4, 2024 10:28 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील संगोळगी येथे वळणावर रस्त्याने पायी चालत येत असलेल्या मजुराच्या अंगावर ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना ३ मे रोजी रात्री एक वाजता घडली. मल्लीनाथ रामण्णा बंडगर (वय ३४, रा. चपळगांव, ता अक्कलकोट) असे अपघातात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्ट्रर क्रमांक एम.एच.१३ ईसी ४१०५ च्या अज्ञात चालकाविरूद्ध दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद अंदप्पा आपण्णा बंडगर (वय ५८, रा. चपळगांव) यांनी दिली. फिर्यादी व मयत मल्लिनाथ बंडगर दोघे मिळून मजुरीच्या कामासाठी मौजे संगोळगी (ब) या गावी गेले होते. दिवसभर काम करून रात्री संगोळगी (ब) गावातच मुक्काम करित होते. २ मे रोजी दोघांनी दिवसभर शेतात मजुरीचे काम करुन रात्री १० च्या सुमारास मुक्कामाकरिता संगोळगी (ब) गावाकडे पायी चालत जात असताना संगोळगी गावाजवळ पाठीमागून एक ट्रॅक्टर भरधाव वेगात आला. व तो रस्त्याच्या डाव्या बाजूस पलटी होवून मल्लिनाथ यांचे अंगावर पडला. चालक घटनास्थळावरून पळून गेला. लोकांच्या मदतीने मल्लिनाथ बंडगर यास खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तो उपचारपूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!