---Advertisement---

अक्कलकोटमध्ये नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई,९ लाख ४४ हजारांचा दंड वसूल

Follow Us:
---Advertisement---

 

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.१४ : राज्यात पुन्हा डोके
वर काढत असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट उत्तर ठाणे आणि अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई सुरू आहे.

या अंतर्गत आतापर्यंत ९ लाख ४४
हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यात विना-मास्क,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,सोशल डिस्टन्स न पाळणे,फिरते भाजीपाला,चारचाकी वाहन यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचे आवाहन डॉ.संतोष गायकवाड यांनी केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव अक्कलकोट शहरात व ग्रामीण भागात वाढु नये याकरिता अक्कलकोट शहरातील
व ग्रामीण भागातील दुधनी, मैंदर्गी येथील मुख्य बाजारपेठेतील सराफ दुकान, कापड दुकान, स्टेशनरी दुकान,व्यापारी भाजी विक्रेते यासह अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे.या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी व दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्याकडून लोकांमध्ये कोरोनाचे ‘गांभीर्य’निर्माण व्हावे तसेच ‘नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी आणि नागरिक सतर्क राहतील यासाठी डॉ. गायकवाड हे रोजच्या रोज प्रभावीपणे आणि परिणामकारक कारवाई करून घेत आहेत.यामुळेच लोकांमध्ये तोंडाला मास्क लावायचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.अक्कलकोट उत्तर व अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी जानेवारी ते आजतागायत विनामास्क,सोशल डिस्टन्स,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,फिरते भाजीपाला, यांचेवर मोठी दंडात्मक कारवाई केलेली आहे.अक्कलकोट उत्तरमध्ये विना-मास्क-८८२ केसेस,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे-१९८ केसेस,सोशल डिस्टन्स न पाळणे-२५२ केसेस, फिरते भाजीपाला-२२ केसेस,चारचाकी वाहन -१ केस या माध्यमातून एकूण १ हजार ३५२ केसेस होऊन
५ लाख ९ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.अक्कलकोट दक्षिण अंतर्गत विना-मास्क- ५८५ केसेस, सोशल डिस्टन्स न पाळणे व इतर केसेस- ७३५ असे मिळून एकूण १ हजार ३१२ केसेसच्या माध्यमातून
४ लाख ३५ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंशिस्तने शासकीय नियमाचे पालन करावे,कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास याहीपेक्षा कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!