---Advertisement---

अक्कलकोट येथे सेवेकऱ्यांना दिवाळीसाठी किराणा वाटप

By team
On: October 24, 2024 7:54 PM
Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट वृत्तसंस्था

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुणेचे प्रसिध्द उद्योगपती सौ. व श्री अविनाश भोसले यांच्या हस्ते अन्नछत्र मंडळातील सेवेकऱ्यांना दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

अन्नछत्र मंडळाच्या यशस्वी वाटचालीसाठी सेवेकऱ्यांचा बहुमोल वाटा आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने त्यांना फराळासाठी लागणारे किराणा साहित्यांचे वाटप करण्यात आले. सौ. व श्री अविनाश भोसले यांच्या समवेत सौ. व श्री विनय काळभोर पुणे हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लाला राठोड, संतोष भोसले, गणेश भोसले, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, स्वामिनाथ गुरव, पिंटू साठे, अशपाक काझी, सौरभ मोरे, रोहन शिर्के, अमित थोरात, विकास खंडाळकर, बसवराज मसुते, बाळासाहेब घाडगे, सुराज्य घाडगे, गोरख माळी, समर्थ यादव, विनायक भोसले, रमेश हळसंगी, समर्थ साठे, महादेव अनगले, अभिजित लोकापुरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रविण घाडगे, गोटू माने, डॉ.प्रकाश राठोड, संजय चव्हाण सोलापूर, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!