ऊस बिले वेळेवर देण्याबरोबरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न ; कपिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ शुगर येथे कार्यक्रम
अक्कलकोट, दि.४ : शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देणे हे तर आमचे कर्तव्यच आहे. परंतु शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न गोकुळ शुगर मार्फत सुरू आहे. उसाचे एकरी उत्पादन वाढविणे हे आता आमच्या समोरचे प्रमुख ध्येय असल्याचे गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी, धोत्री (ता.दक्षिण सोलापूर ) येथील गोकुळ शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार सोहळा व कारखान्याच्या यंदाच्या यशस्वी गाळप हंगाम सांगता समारंभ निमित्त शेतकऱ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावर्षी वास्तविक पाहता जास्तीचा पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनात मोठी घट झाली परिणामी टनामध्ये देखील मोठी घट पाहायला मिळाली. तरी देखील गोकुळ शुगरने पाच लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळप करून शेतकऱ्यांना वेळेवर बिले दिले. यापेक्षा दुसरा आनंद आमच्या जीवनामध्ये नाही. यापुढे देखील या कारखान्याची वाटचाल अशा पद्धतीने सुरू राहील यात शंका नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सहकार्य केले. यापुढे कारखानाही शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करेल. गोकुळ परिवारावर असेच प्रेम व सहकार्य कायम राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच कारखाना कार्यस्थळावर विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन,संचालक,ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी हे कार्यक्रम स्थळी येऊन शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण, गोकुळ शुगरचे संस्थापक बलभीम शिंदे, व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, पृथ्वीराज माने, आनंद तानवडे, शिवसेनेचे अनिल खोचरे, रणवीर चव्हाण, अमोल व्हटकर, सिद्धार्थ गायकवाड, के.बी पाटील, कल्याणराव पाटील, अंबणप्पा भंगे, मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील, अभिजीत गुंड, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, राजू चव्हाण, नागराज पाटील, अशपाक अगसापुरे, सिद्धाराम भंडारकवठे यांच्यासह कारखान्याचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार, वर्क्स मॅनेजर राजकुमार लवटे, केन मॅनेजर रामचंद्र शेंडगे, प्रोसेस मॅनेजर एस.पी भावसार, शेती अधिकारी फक्रुदिन जहागीरदार आदिंसह शेतकरी बांधव, ऊस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा सत्कार कधीही विसरणार नाही
शेतकरी आमचे दैवत आहेत त्यांनी केलेला सत्कार हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे तो सत्कारणी कसा लागेल.यासाठी आता मी प्रयत्न करणार आहे. आजचा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही – कपिल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर गोकुळ शुगर