ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयंत पाटील लवकरच अजितदादांसोबत असतील – अमोल मिटकरी

मुंबई, वृत्तसंस्था

राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी बोलताना ‘दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. जयंत पाटलासाठी हीच ती योग्य वेळ, आता राम कृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगीरी असंही अमोल मिटकरी म्हणाले. सभागृहात बोलताना जयंत पाटलांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा नियम असल्याचं म्हटलं होतं. त्यावर अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील आता राष्ट्रवादीत येतील असा दावा केला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, जयंत पाटील म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. मधली ओळ अशी आहे की लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ते असतील. शरद पवार साहेबांचं आवडीचं गाणं आहे ‘तुम इतना क्यू मूस्करा रहा हो’. त्यानुसार मे इतना मुसकरा रहा हू दिल मे खुशी छुपा रहा हू. जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत. गेल्या वेळच्या महायुतीच्या सरकारच्या 10 कॅबिनेट बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना बोलावलं होतं. जयंत पाटील त्यावेळी हसले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!