ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्नछत्र मंडळाने दिला पर्यावरण संवर्धनाचे संदेश : २२ कामगार लावून रंगविल्या भिंती !

अक्कलकोट :  प्रतिनिधि

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने शहरात सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचे काम करताना फत्तेसिंह मैदाना भोवतालच्या कुंपणभींती २२ कामगार लावुन विविध आकर्षक रंगात रंगवुन त्यावर विविध पर्यावरण संवर्धनाचे संदेश लिहल्याने सामान्य नागरिकांमधुन कौतुक होत आहे. या रंगरंगोटी सोबतच निरूपयोगी गवत, दगड धोंडे काढुन स्वच्छता करून मैदानाची शोभा वाढविली आहे. येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडुन दररोज हजारो स्वामीभक्तांना मोफत महाप्रसाद दिला जातो. या स्वामीसेवेसोबतच अन्नछत्र मंडळ विविध समाजपयोगी कामे करत असते. यात वृक्षारोपण आदी पर्यावरण पुरक उपक्रमांना प्राधान्य असाते.

त्यासोबतच फर्तेसिंह मैदानाच्या सभोवताली असलेल्या कुंपण भींतीला आकर्षक रंगरंगोटी करून त्यावर झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा, वृक्षसंवर्धन, बेटी बचाव बेटी पढाऊ, पर्यावरणाची धरा कास तरच होईल मानविचा विकास,पाणी वाचवा पाणी जिरवा,स्वच्छ सुंदर अक्कलकोट, स्त्री भृणहत्या टाळा आदीसह विविध सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश लिहुन न्यासाकडुन जनजागृती केली जात आहे. फर्तेंसिंह मैदानावर व्यायामासाठी व फिरण्यासाठी दररोज हजारो नागरिक येत असतात. फर्तेसिह मैदानावर वृक्षारोपण सोबतच जनजागृती फलक लिहल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

अमोलराजे भोसले मुख्य कार्यकारी विश्वस्त अन्नछत्र मंडळ- अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यास विविध उपक्रम राबवित असते.

ऐतिहासिक फर्तेंसिंह मैदान सुंदर दिसावे म्हणून न्यास हजारो रूपये खर्च करून प्रतिवर्षी रंगरंगोटी करून पर्यावरण विषयक संदेश देत आहे. तसेच पोलीस प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत शहरात शेकडो दिशादर्शक फलक व सुचना फलक लावले आहेत.

स्वामीभक्त रामचंद्र समाणे- अन्नछत्र मंडळ सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित असाते.फत्तेसिंह मैदानावरील प्रवेशद्वार सह कुंपणभींती रंगवुन विविध पर्यावरणविषयक संदेश लिहल्याने सुंदरही दिसत आहे आणि संदेशही दिला जात आहे.

या आहेत संदेशपर सुविचार-
पर्यावरणाची धरा कास तरच होईल मानवाचा विकास, बेटी बचाव बेटी पढाओ, झाडे ला वा झाडे जगवा, वृक्षारोपण वृक्ष संगोपन करा, पाणी हे जीवन आहे, पाण्याचा अपव्यय टाळा, प्रदुषणाला आळा घाला पर्यावरणाचा नाश टाळा, पाण्याचे रक्षण धरतीचे संरक्षण , निर्सगाचे नियम पाळा प्लास्टिक वापर टाळा, पाणी अडवा पाणी जिरवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ परिसर निरोगी निरंतर, पर्यावरणाचे रक्षण हेच खरे मुल्य शिक्षण , स्वच्छ अक्कलकोट सुंदर अक्कलकोट , खेलने कुदने का लो संकल्प स्वस्थ रहनेका यही विकल्प, गांधीजीका यही था नारा, स्वच्छ भारत देश हो हमारा, वृक्ष लावा एकतरी पर्यावरणाचे रक्षण करी, स्वच्छता शिका आरोग्याला जिंका, पाण्याचे संरक्षण धरतीचे रक्षण,स्वच्छता असेल जिथे, आरोग्य वसेल तेथे आदी.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!