ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आदेशाची वाट न बघता जशाच्या तसे उत्तर द्या; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरात आज भाजपचे महाअधिवेशन सुरु असून या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील सवांद साधला आहे.

भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उत्तर देता येते, पण तो विचार करतो की, आदेश आला तर उत्तर देईल. मात्र, आता सर्व पदाधिकाऱ्यांनी आदेशाची वाट न बघता जशाच्या तसे उत्तर द्या. केवळ हीट विकेट होऊ द्यायची नाही, चार दिवस आपल्या बोलण्याचीच उत्तरे द्यावे लागतील असे बोलू नका. खरे बोलायला विचार करावा लागत नाही, तुम्ही खोट्याला खऱ्याने उत्तर द्या, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

 

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही मर्यादित काळासाठी आरक्षण दिले होते. तो काळ संपत असताना युतीचे सरकार होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला, आज जे आरक्षण चालले आहे ते अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा वाढवल्याने म्हणून या देशात संविधानाने दिलेले आरक्षण सामान्य लोकांना मिळत आहे, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, काही जण महायुती निवडून आली तर आरक्षण संपवणार, संविधान बदलणार असे खोटे नरेटीव्ह पसरवत आहेत. फेक नरेटीव्हला जास्त दिवस टीकत नाही. खोटे जास्त दिस टिकत नाही. यांच्या खोट्या विजयाचा फुगा विधान परिषदेच्या निवडणुकीत यांचा फटला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!