ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अयोध्येतील राम मंदिर सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाला पोलिसांनी बिहारच्या अररिया जिल्ह्यातून अटक केली. फोनवर ही धमकी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर तपास अभियान राबवत पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे रविवारी अधिकाऱ्याने सांगितले.

बिहार पोलिसांनी नागरिकांना आपत्कालीन मदत करण्यासाठी ११२ हा हेल्पलाइन नंबर सुरू केलेला आहे. १९ जानेवारीच्या रात्री या नंबरवर फोन करत आरोपीने सोमवारी राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत पलसी पोलीस ठाणे हद्दीतील बलुआ कालीगंज येथील इन्तेखाब आलम नावाच्या युवकाला अटक केली. हा युवक भोळसर असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र, अयोध्येतील राम मंदिर हा संवेदनशील मुद्दा असल्याने या धमकीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती सायबर विभागाला दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!